जिकडे पहावे तिकडे हरि I

जिकडे पहावे तिकडे हरि । हरि दाटला अंबरी ॥
नरनारी भेद गेला  ।   एक हरीच साठला ॥
दु:ख गेले दुरावून । सुख पळाले आपण ॥
तुकड्या म्हणे समस्थिति । आली दोन्हीविण हाती ॥