जया बंध अंगी वाटे I

जया  बंध  अंगी वाटे । तेणे  मुक्ति गावी नेटे ॥
हे तो आपुल्याची मने । केले बंध मुक्ति-जिणे ॥
आत्मा अखंड अमर । तया नाही हा व्यवहार ॥
तुकड्या म्हणे मी निर्भय । नाही नाही बंधभय ॥