आम्ही गलितपत्रापरी l

आम्ही गलितपत्रापरी । आता राहिलो संसारी ॥
तुटला मायिकांचा झरा । पिकलो विटुनिया संसारा ॥
झोंबलोसे मूळ भूमि । सख्या विठ्ठलाचे नामी ॥
तुकड्या म्हणे तुटला देठू । आशा पाश हा चिवटू ॥