गेले सोवळे आमुचे I

गेले सोवळे आमुचे । तुटले बंधन जीवाचे ॥
नाते गोते तोडातोडी । केली पंढरीची जोडी ॥
जात मिळविली संतांची । जोड़ दिलली हरिनामाची ॥
तुकड्या म्हणे नारायण । राखी आम्हा रात्रंदिन ॥