तोचि अखंड सोवळा I

तोचि अखंड सोवळा । जो जो भजे या गोपाळा ॥
ज्यासी न शिवे काम क्रोध | दंभ मत्सरादि बंध ॥
नाही हृदयी कपट निंदा । अखंड स्मरे त्या गोविंदा ॥
तुकड्या म्हणे तो ब्राह्मण । पावन होय जातीविण ॥