काळ या देहाचा वाली I

काळ या देहाचा वाली । काय  मी म्हणसी बोली? ॥
तुझे असते जरी घर । तरि का भेटे दुजे दार? ॥
सर्व सोडूनिया जाशी । अंती काही ना पाहसी ॥
तुकड्या म्हणे राम तुझा । शरण जाई केशवराजा ॥