करा गडी नारायण I

करा गडी नारायण! । हरा संसाराचे भान ॥
नाही नाही त्यात सुख । दुःख भोगाल आणिक ॥
संत सांगती गर्जून । याचा अनुभव घेऊन ॥
तुकड्या म्हणे तुमच्या घरी । पहा वडिलांच्या चरित्री ।।