होय जेवढे ते साधा I

होय जेवढे ते साधा । परी न सोडा गोविंदा ॥
थोड्या वेळातला वेळ । काढा भजाया गोपाळ ॥
नका आयु खोवू रिते । दुःख पावाल मागुते ॥
तुकड्या म्हणे सावधान । करा हरीचे भजन ॥