हरि पाहतो दुरून I

हरि पाहतो दुरून । कपटियांचे अंतःकरण ।
काय करिती चांडाळ । कार्य लोकी अमंगळ ॥
चित्रगुप्त हाते लिखी I भोग द्यावयासी शेखी ॥
तुकड्या म्हणे जैसे करी । तैसा भोग ये पुढारी ।।