जैसे करावे वर्तन I

जैसे करावे वर्तन । फळ देतो नारायण ॥
सत्य चालो सत्य होई । पाप करू यम नेई ॥
करू देहाचा उद्धार । देव उघडी अपुले दार ॥
तुकड्या म्हणे दास होता । मुक्ति पावे सायुज्यता ॥