जैसा भितो क्षणक्षणा I

जैसा भितो क्षणक्षणा । तैसा योग्य का वागेना ? ॥
काय होते भीति घेता । नाही चित्ती निर्मळता ॥
सोड़ी पापाचे वर्तन । नाही भीतीचे कारण ॥
तुकड्या म्हणे आपूल्याने । नर्का मोक्षा मिळे जाणे ॥