विषयी होऊ नका रत I

विषयी होऊ नका रत । घात होईल नेमस्त ॥
विषयी कोणा सुख झाले । ऐसे दाखवा दाखले ॥
विषयी आयुष्याचा नाश । रोग पोखरी अंगास ॥
तुकड्या म्हणे विषय सोडा । धरा सन्मार्गाचा धडा ॥