विषये रावण मातला I

विषये रावण मातला । त्याचा अधःपात झाला ।॥
विषये चंद्रा कळा आली । मागे ग्रहणे लागली ॥
विषये इंद्रा पडले भग । शापे भोगविले भोग ॥
तुकड्या म्हणे दुर्योधन । गेला सोडूनिया प्राण ॥