विषये भस्मासुर मेला I

विषये भस्मासुर मेला । अपुल्या हाते भस्म झाला ।।
विषये साधुसंत गेले । उंच शिखरावरुनी खाले ।।
विषये नारद भुलला । स्वये नारदी जाहला ।।
तुकड्या म्हणे सावधान । नेणो कधी गोवी प्राण I I