विषय घेरतील अंगा I

विषय घेरतील अंगा । लागू न द्या त्यांच्या रंगा ॥
नका नटू थटू जनी । काळ पाहतो वरूनि ॥
नका कोणा दुःख देऊ । चित्रगुप्त लागे लिहू ॥
तुकडया म्हणे निर्भय मनी । जावे विट्ठली रंगोनि ॥