चला चला पंढरीसी I

चला चला पंढरीसी । व्रत करा एकादशी ॥
आळसासी दूर सारा । वर्ज्य करुनी अमिताहारा ॥
भाव धरोनिया चित्ती । करा पांडुरंग-स्तुति ॥
तुकड्या म्हणे कलियुगी । नाम स्मरा संतसंगी ॥