करा जीवाचे कल्याण I

करा जीवाचे कल्याण । नामी लावोनिया मन ॥
सोडा आळसा विकारा । वाट पंढरीची धरा   ॥
रंगा संतांचिये रंगी ।  नाचा आलिया प्रसंगी    ॥
तुकड्या म्हणे सोडा गर्व । भजा पंढरीचा राव ॥