गर्व नका धरू कोणी I

गर्व नका धरू कोणी । काय झाले त्या रावणी ॥
जग धर्मशाळा आहे । कोण अखंडित राहे? ॥
राजे महाराजे गेले । पुन्हा कोणी ना पाहिले ॥
तुकड्या म्हणे भजा देव । सोडा देहाचा गौरव ॥