सोनियाचे लंकापूर I

सोनियाचे लंकापूर । झाले क्षणी केवळ धूर ॥
गर्व केला रावणाने  I भोग आला हा दैवाने  ॥
सर्व  धना झाला ऱ्हास । रावणासहित झाला नाश ॥
तुकड्या म्हणे गर्व सोडा । त्याचा घेऊनिया धडा ॥