ठेवा आपुले वर्तन I

ठेवा आपुले वर्तन । शुद्धबुद्ध रात्रंदिन  ॥                 नका विकल्प वाढवू । पापे अंगी वा दडवू ॥
सज्जनांचा ठेवा मान । मिळवा संतसंगे ज्ञान ॥
तुकड्या म्हणे ऐसे होता । पावे थोरांची पात्रता ॥