सर्व लोका सांभाळावे I

सर्व लोका सांभाळावे । तेव्हा थोरपण घ्यावे ॥
क्षमाशील अंगी व्हावे । तेव्हा थोरपण घ्यावे ॥
जना सुमार्गी लावावे । तेव्हा थोरपण घ्यावे ॥
आपण स्वतः आचरावे । तेव्हा थोरपण घ्यावे ॥
तुकड्या म्हणे दास व्हावे । तेव्हा थोरपण घ्यावे ॥