जग वाहते वाहणी I

जग वाहते वाहणी । ओढ्यापरी या कैचणी ॥
कधी काही कधी काही । एक रंग त्यासी नाही ॥
धावे थोरपणाकडे । परी ज्ञान ना रोकडे ॥
तुकड्या म्हणे मरती येणे । अंतरती प्रभु खुणे ॥