जेथे जेथे मोठेपण I

जेथे जेथे मोठेपण । सर्व मानिती आपणा ॥
कोण कोणाचे ऐकतो ? | सर्वा अहंकार येतो ॥
मोठेपणा जो तो वानी । उरला नाहीच अज्ञानी  ॥
तुकड्या म्हणे वारे मोठा । ज्ञानाविण हा करंटा ॥