त्याचे करंटे कपाळ I

त्याचे करंटे कपाळ । नाही सुसंगाचा मेळ ॥
त्याची दरिद्री वासना । जो की पात्र नाही ज्ञाना ॥
तोचि जाणा कर्महीन । ज्याचे शुद्ध नाही मन ॥
तुकड्या म्हणे सर्व व्यर्थ । नाही मुखी पंढरीनाथ ॥