रात्रंदिन त्याची फेरी |

रात्रंदिन त्याची फेरी । तरीच जगलो संसारी ॥
नाहीतरी काय होय । अपघाती प्राण जाय  ॥
त्याच्या कृपे देह चाले | क्षणोक्षणीहि रक्षिले ॥                      तुकड्या म्हणे ऐसा भाव I धरा तेव्हा लाभे देव ॥