सकळी साच मानावया I

सकळी साच मानावया । एक आम्हा दिसे पाया ॥
गावे श्रीहरीचे नाम  I शुद्ध लावोनिया प्रेम  ॥
तोचि सकळ काही करी । अपुली मिरवू नये थोरी ॥
तुकड्या म्हणे तयाविण । सर्व अहंकारी जन ॥