आम्हा सर्वचि समान I

आम्हा सर्वचि समान । विष्णु शिव कोठे दोन? ॥
ध्याती एकमेका लागी । भेद न गमे विभागी ॥
शुंभु विष्णु-ध्यान करी । विष्णु पूजी शंभू शिरी ॥
तुकड्या म्हणे दोन्ही बीजे । डाळी एकचि निपजे ॥