रूपा आणले रंगाने I

रूपा आणले रंगाने । देव मोठा पुजाऱ्याने ॥
सांगे मिथ्याच थोरीव । पावे नवसाला देव ॥
मांडी सटवी कटवी देवी । पांग तोंडाचे फेडवी ॥
तुकड्या म्हणे हिंसा केली । त्याने धर्मा आगी दिली ॥