उगीच बकरे कापावे I

उगीच बकरे कापावे । म्हणती देवापाशी द्यावे  ॥
नाक घासती जाऊनी । म्हणती पुत्र दिला यांनी ॥
नवसा तूच का न गेला ? । देवाचा जरि भक्त झाला ॥
तुकड्या म्हणे जिभेसाठी । घाली देव मिसे अटी ॥