जन बोलक्या तोंडाचे ।

जन बोलक्या तोंडाचे । जैसे कोलते अग्नीचे ॥
काही नेणती विचार । जाळिताती सकळ घर ॥
सत्यासत्य मागे राहे । धरिती खोटियांचे पाय ॥
दगडा देती जीवदान । सांगे पावला  म्हणोन ॥
तुकड्या म्हणे ज्ञानाविण । जन भोगती पतन ॥