आम्ही देव म्हणो तया l

आम्ही देव म्हणो तया । ज्याची सत्ता त्रैलोकी या ॥
नव्हती अमुचे देव धोंडे । नका करू कानकोंडे  ॥
सकळ भाव हे आमुचे  ।   जाणे देव  अंतरीचे  ॥
तुकड्या म्हणे उपासना । म्हणूनी केली ही स्थापना ॥