कोणा सापडली चाली I

कोणा सापडली चाली । पहायासी वनमाली ॥
त्याचे दूर भासे घर । नाही बुद्धीसीहि थार   ॥
इंद्रियांची काय सीमा । पहावया घनश्यामा  ॥
तुकड्या म्हणे भक्ते केली । वाट सोपी दाखविली ॥