सगुण मूर्ति ध्याना- विण I

सगुण मूर्ति ध्याना-विण । मन क्षण न राहे ॥
निर्गुणाची वार्ता दुरी । गहन खरी आम्हाते ॥
म्हणुनी आवडी हे केली । दासी भली सगुणाची ॥
तुकड्या म्हणे आलो जन्मा । घ्याया नामा देवाच्या ॥