गूढ परक्यांसी देव |

गूढ परक्यांसी देव । भाविकांसी तो सदैव ॥
तपी पाहती अरण्यी । भाविकांच्या बसे मनी ।।
ज्ञानी बोलती बोलणी । भाविक पाहती लोचनी ॥
तुकड्या म्हणे शुद्ध भाव । तेणे दिसे पंढरीराव ॥