काय बाहेरीच्या सोंगी I

काय बाहेरीच्या सोंगी । भक्ति पावे पांडुंगी? ॥
सर्वसाक्षि जगज्जीवन । जाणे अंतरीची खूण ॥
काय होते लपविल्याने । देव पाही प्रकाशाने ॥
तुकड्या म्हणे सत्य करा । तरीच देव दे आसरा ॥