ज्याचा जीव नारायण I

ज्याचा जीव नारायण । त्याची देव पुरवी आण ॥
येर दुरुनी भक्ति करी । देवही तो राही दुरी  ॥
जैसा कोणी त्यासी पाहे । तैसा फळ दे लवलाहे ॥
तुकड्या म्हणे त्याचे व्हारे । देव धावतो सामोरे  ॥