योगी लावुनी समाधि I

योगी लावुनी समाधि । बघती शून्याचिये संधी ॥
नये तयाच्याहि ध्याना I फेरी घालतसे राना  ॥
गोपाळाने हाक दिली । नाचे कोमल पाऊली ॥
काय भाग्य त्या गोपांचे । न वर्णवे आम्हा वाचे ॥
तुकड्या म्हणे घ्यारे धडा । वाचा तयांचा पोवाडा ॥