गोपींचिये मागे धावे I

गोपींचिये  मागे  धावे  ।    ऐसे देवाचे गोडवे ॥
कोणा दळू कांडू लागे ।  जाई गायी मागेमागे ॥
कोण्या गौळणीचे लोणी । देव खातसे चोरूनी ॥
तुकड्या म्हणे भाग्य त्यांचे । देव ताकासाठी नाचे ॥