दिवा लावायाच्या मिसे I

दिवा लावायाच्या मिसे । गोपी गेली ती सायासे ॥
दिसला द्वारकेचा राणा । पडली भूल तिच्या मना ॥
दिवा धरी दिव्यावरी । बोट जळेतो बिचारी ॥
तुकड्या म्हणे ऐसे प्रेम । कैसा न भेटे घनश्याम ॥