कानी ऐकता बांसरी I

कानी ऐकता बांसरी । राधा होय वेड्यापरी ॥
काय अलौकिक प्रेम I पूर्ण करी घनश्याम  ॥
नाही तिला देहभान । वस्त्र सावरी नारायण ॥
तुकड्या म्हणे ऐशा जनी । का न येई तो धावूनि ? ॥