सर्व भार देवावरी I

सर्व भार देवावरी । काय करणे ते तो करी ॥
ऐसा ज्याचा दृढ नेम । प्रभु करी त्याचे काम  ॥
मागे केले पुढे करी । शंका नाही तिळभरी ॥
तुकड्या म्हणे घ्या विश्वास । शरण जा हो! विठ्ठलास ॥