गरुडावरी बसणारा I

गरुडावरी बसणारा । वैकुंठीचा राहणारा  ॥
सोडूनिया थोरपणा । करी भक्त- कामे नाना ॥
इतुके त्यासी भक्तप्रिय । नाही नाही हो संदेह ॥
तुकड्या म्हणे भक्ति करा । अखंड सुख येई घरा ॥