अंगे सांभाळितो हरि I

अंगे सांभाळितो हरि । भक्तजनांची शिदोरी ॥
नलगे भक्ता करणे काही । सुख तया सर्वदाहि ॥
दामाजीची सेवा केली । देवे रसीद भरली ॥
तुकड्या म्हणे सांगो किती । माझ्या विठ्ठलाची ख्याती  ॥