हासे भक्तांच्या हासणी |

हासे भक्तांच्या हासणी । दुःखी भक्तांच्या जाचणी ॥
त्याचा सर्व सुख भार । नांदे भक्ताचिया वर ॥
येर नाही त्यासी गोत । सोडुनि आला वैकुंठात ॥
तुकड्या म्हणे हे गोपाळ । आले खेळावया खेळ ॥