ठेविला पायरीशी नामा I

ठेविला पायरीशी  नामा | परी ग्रंथ आले कामा ॥
शत कोटींचा संकल्प । पूर्ण झाला आपोआप ।।
त्याचे कामी देव आले । देवे अभंगु हे केले  ॥
तुकड्या म्हणे धरा भक्ति । वाचा अभंगांच्या श्रृति ॥