कळते परि वळत नाही I

कळते परी वळत नाही। अमुचा अनुभव साक्ष देई ॥
नये खाऊ ते खाय मन । म्हणे  न करावे आपण ॥
महापाप  आहे  म्हणे ।     परी  भोगी दीनपणे    ॥
तुकड्या म्हणे नाही बळ । मन वळवाया  केवळ ॥