जोवरी वासनाक्षय नाही झाला

जोवरी वासनाक्षय नाही झाला । 
म्हणावे तयाला साधु केवी  ? ॥
देहीच विदेही लोकी परलोकी । 
ब्रह्मरूप घोकी तोची  संत ।।
हृदयीचे चिन्ह पडले बाहेरी । 
वाचा गुणकारी प्रेमाची ती  ॥
तुकडयादास म्हणे नित्यानित्य पाहे। 
तोचि संत होय  ऐसे जाणा ।