तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
तृप्त झाला ज्ञाने
तृप्त झाला ज्ञाने व्यष्टि-समष्टिने ।
मनाची बंधने दूर झाली ॥
मृत्तिका समान कनक जो मानी ।
दिशे ना कामीनी कामखूपे ।।
भोगरूप भोग निवारिला ज्ञाने ।
आत्मज्ञान-लेणं शृंगारिले ।।
तुकडयादास म्हणे तोचि झाला संत ।
लावलास अंत भगवंताचा ।।