संता आम्हा काय भेद I

संता आम्हा काय भेद । पाहो जाता सत्य शोध? ॥
संत मूळ स्वरुपी गेले । आम्हा नाही ते कळले  ॥
तेचि कळावे सर्वांशी । हाचि धर्म संतांपाशी ॥
तुकडया म्हणे पाहो जाता । नाही देवा भिन्न सत्ता ॥