संत हृदय जैसे लोणी I

संतहृदय जैसे लोणी । काढियलेसे मंथोनी ॥
स्वच्छ शुभ्र मऊ फार I गुणदायी हे गंभीर  ॥
त्यांचा संग जरा होता । अंगी लाभते शांतता ॥
तुकडया म्हणे भवरोगा। नाही उपाय या जोगा ॥